● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷देव माणसात राहतो🌷
जातपात व्यर्थ देव माणसात राहतो
मी उगीच नेहमीच पत्थरात शोधतो
पांडुरंग पंढरीत भेटणार ना कधी
विठ्ठलासवेच बाप वावरात राबतो
ठेवले करून कर्म भोग मीच भोगतो
राहिले कितीक शेष जीवनात पाहतो
दुःख यातना नकोच अन नकोच त्या व्यथा
केर तो उगाच खोल काळजात साचतो
सांजवेळ सोबतीस वेदना सतावते
का तरी तुझ्याच सांग आठवात धावतो
सौ. आशा सचिन भावसार
जालना
गझलकारा आशाजी भावसार यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments