Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पाश सारे मनामधे होते Gazalkara Yogita Takatvar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷पाश सारे मनामधे होते🌷


मुक्त तर मी घरामधे होते

पाश सारे मनामधे होते


डाव पक्के मला कुठे जमले

खेळ कच्च्या वयामधे होते


मीच कुरवाळली इजा कायम

लोक सारे सुखामधे होते


काजवे समजले सहज ज्यांना 

तेच तारे नभामधे होते


वाटले आपले मला जे जे

तेच वैरी घरामधे होते


सौ. योगिता तकतराव

मुंबई



 गझलकारा योगिताजी तकतराव यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments