● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷वाया गेली🌷
थोडी थोडी म्हणता म्हणता बक्कळ वाया गेली
असे वाटते या जन्मीची चक्कर वाया गेली
झुंजत असता असा व्यथेच्या प्रेमामध्ये पडलो
कसा म्हणू मग सुखा सोबती टक्कर वाया गेली
कधी सुकवते कधी भिजवते पापणीतले पाणी
डोळ्यातच स्वप्नांची इच्छा रग्गड वाया गेली
स्वप्नांसह पळण्याची शर्यत हरल्यानंतर कळले
होती नव्हती आयुष्याची चिल्लर वाया गेली
उगाच गेली वारीला त्या झिजल्यानंतर कळले
कोर्ट कचेरीच्या वाटेवर चप्पल वाया गेली
खादी मधल्या अंगुठ्याचा पी.ए. मनात कुढतो
पदवीसाठी चालवलेली शक्कल वाया गेली
कळला नाही तिच्या मनाला भाव मनाचा माझ्या
तिच्याचसाठी यशवंताची अक्कल वाया गेली
डॉ. यशवंत मस्के
गंगाखेड
गझलकार डॉ. यशवंतजी मस्के यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments