● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷काळजावर नाव तोवर गोंदले🌷
लागला ना थांगपत्ता दुःख येथे गोठले.
बातमी केली जगाने आसवांशी मांडले.
जिंदगीभर माय वेडी वाट बघते का अशी,
ना कधी कळले तिलाही स्वप्न केव्हा भंगले.
दुष्ट भोंदूंची घराणी माजली सारी इथे,
खूप अत्याचार केले अन् पुरावे झाकले.
कवडसा माझ्या मनाचा आजवर हलला कुठे,
पाहिले हलवून जेव्हा मळभ काळे दाटले.
प्रेम आहे सांगता नाही कधी आले तुला
काळजाने काळजावर नाव तोवर गोंदले
मेहमूदा शेख
गझलकारा मेहमूदाजी शेख यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments