● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 दे दान पांडुरंगा 🌷
सोडून मोह सारे दे दान पांडुरंगा
चरणी तुझ्याच जागा दे छान पांडुरंगा
यंदा मनात आहे वारी तुझी करावी
हृदयात जाणलेले ते स्थान पांडुरंगा
कष्टात रापलेला वारीत रंगलेला
हिरवे शिवार त्याचे कर धान पांडुरंगा
लेकीस जन्म देणे आता कठीण आहे
झालेत लांडगे तर बेभान पांडुरंगा
संस्कार देत होती शाळा खरी मुलांना
नाते टिकून आहे ही शान पांडुरंगा
बेभान वादळाचा ना लागला सुगावा
आव्हान पेलण्याचे दे भान पांडुरंगा
वृद्धाश्रमात मुलगा सोडून आज गेला
म्हणतो समाज त्याला नादान पांडुरंगा
सौ. प्रतिभा विभूते
पुणे
गझलकारा प्रतिभाजी विभूते यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments