● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷शब्दसुगंधी🌷
गुंफण्यासाठी 'गजलओळी'त माझ्या
दे सुगंधी शब्द तू..झोळीत माझ्या...
आग लाउन होर्पळू दे एकदाचे
द्वाडकर्मी,लांडगे होळीत माझ्या...
घे कराया आमचाही पक्ष बळकट
सालसांची वाढ कर टोळीत माझ्या...
त्या जगाचेही करू दे मज भले तू
गुंतले जे राखरांगोळीत माझ्या...
जे हवे ते गरजवंताला मिळू दे
हर गटाचे रक्त चारोळीत माझ्या...
बालाजी मुंढे (बिंधास्त)
किनगांव जि.लातूर
गझलकार बालाजी मुंढे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments