● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 जुने संदर्भ आठवतात अजुनी 🌷
कशाला द्यायचा सल्ला नकॊ त्या माणसांना
चला शिकवू गरज आहे निरागस लेकरांना
अशा नाजूक वळणावर उभी आहेस पोरी
निसरडी वाट दिसल्यावर जपावे पावलांना
नकॊ काजळ, नकॊ गजरा,नको घालूस बिंदी
नभीचा चंद्र हा नाही पटेना चांदण्यांना
वहीमधले जुने संदर्भ आठवतात अजुनी
मनाच्या आत पुरले मी अशा सुंदर क्षणांना
किती नाजूक दिसते स्त्री तरी खंबीर असते
कशी सांभाळते अलवार ती दोन्ही घरांना
माधुरी खांडेकर
गझलकारा माधुरीजी खांडेकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments