● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷सोनचाफ्यात मिसरे🌷
कुणी पाहतो सोनचाफ्यात मिसरे
कुणी शोधतो रोज लाफ्यात मिसरे
असो शांतता की असू दे लढाई
जवळ ठेवतो दोन ताफ्यात मिसरे
रिकामा निघाला खिसा ऐनवेळी
दिले प्रेयसीला लिफाफ्यात मिसरे
सहन जन्मभर मानहानीच केली
कधी राहिले ना मुनाफ्यात मिसरे
कधी भाव येईल सोन्याप्रमाणे
झळकतील केंव्हा सराफ्यात मिसरे?
बुडवले जगाने कितीदा तरीही
तरत राहिले बघ तराफ्यात मिसरे
गझल अंतराळात लागेल बहरू
तुझ्या 'चंद्रमा' पेर वाफ्यात मिसरे!
चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र)
नांदेड (९९२१७८८९६१)
गझलकार चंद्रकांतजी कदम यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments