Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नवा संसार दोघांचा Gazalkar Jaywant Wankhade

 

Gazalkar Jaywant Wankhade
Gazalkar Jaywant Wankhade

नवा संसार दोघांचा 

मला जे पाहिजे असते तसे  निवडून घेतो मी

सुखाला ठेवतो मागे व्यथा ओढून घेतो मी


नवा संसार दोघांचा सुखाने चालला आहे

मला समजून घेते ती तिला समजून घेतो मी


व्यथेचा दोस्त झालो हे सुखाला भावले नाही

दिली धमकी सुखाने मज तुला पाहून घेतो मी


स्वतःपुरती ठरवली मी सुखाची वेगळी व्याख्या

रिकामा ग्लासही भरला असे मानून घेतो मी


मला राहायला तर जायचे नाहीच चंद्रावर

तिथेही प्लॉट मिळतो का तरी जाणून घेतो मी


 जयवंत वानखडे,कोरपना

          जिल्हा चंद्रपूर

    भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५

Post a Comment

0 Comments