● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 संदर्भ यातनांचे 🌷
संदर्भ यातनांचे छळतात आठवांना
होतात शांत अंती भिजवून पापण्यांना
करतात प्रेम कायम त्या तापत्या उन्हावर
नभ सावळे सरींचे पिडतात सावल्यांना
बघतात वाट कायम ते चंद्र चांदण्यांची
छळते तिरीप उन्हाची स्वप्नात चोरट्यांना
छाटून कंच राने घडतो विकास जगती
पण तोच फार नडतो निष्पाप वनचरांना
संवाद संपल्यावर उरतात फक्त भिंती
घरपण दुरावण्याची मिळते सजा घरांना
डाॅ अमिता गोसावी
गझलकारा डॉ. अमिताजी गोसावी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments