Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शोधू जरा Gazalkara Rekha Deshmukh

          ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷 शोधू जरा 🌷


दु:खितांच्या चेह-यावर हासणे शोधू जरा

संकटाच्या काळरात्री चांदणे शोधू जरा


भावनेला ओल नाही, ओढ सगळी आटलेली

काळजाच्या आतली आक्रंदने शोधू जरा 


साधला उत्कर्ष त्याने ऱ्हास झाली शेपटी

माकडाच्या त्या यशाची  कारणे‌ शोधू जरा


वेचले आयुष्य त्यांनी कष्ट करुनी चांगले

मायबापाच्या सुखाची रांजणे शोधू जरा


पाखरांना गोफणीचे भय नसावे वाटले

जीवघेणे वेगळे बुजगावणे शोधू जरा


डाॅ. रेखा देशमुख 

बाणेर, पुणे


 गझलकारा डाॅ. रेखाजी देशमुख यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments