Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

इशारा असावा Gazalkar Anil Kambale

Gazalkar Anil Kambale
Gazalkar Anil Kambale

इशारा असावा


 तुझा चोरटा तो इशारा असावा

नभी मदभरा मग नजारा असावा


कधी हर्ष व्हावा कधी दुःख ल्यावे

खुळ्या आठवांचा पसारा असावा


तुझ्या सोबतीने धुक्याने सजावे

पुन्हा अंगभर तो शहारा असावा


अशी कोणती आस तू लावली की

तुझा फक्त आता सहारा असावा


तिथे टाळले जावयाला उन्हाने

तिथे सावलीचा निवारा असावा


जरी थांग नसतो कधी सागराचा

तरी लाट येण्या किनारा असावा


कसे भ्रष्ट होतील हे लोकनेते

तयांवर जनांचा दरारा असावा


जुन्याकाळच्या त्या प्रथेला उजाळू

मनी पेटलेला निखारा असावा


मनी लोभ येण्यास मज्जाव व्हावा

असा सद्गुणांचा पहारा असावा


   ....अनिल

Post a Comment

0 Comments