• गझल प्रभात • (भाग २ )
Gazalkar Dr Shivaji Kale |
🌹छतावर रात्रभर घोंगावते काहीतरी 🌹
रात्र वेड्या पावसाला सांगते काहीतरी
मग छतावर रात्रभर घोंगावते काहीतरी
काय दुनियेला इथे गवसत असावे नेमके
सारखी वाड्यात पडक्या शोधते काहीतरी
खिन्न मुलगी मंदिराच्या पायरीवर थांबते
सांडते काहीतरी अन् वेचते काहीतरी
ही निराशा की हताशा माहिती नाही मला
बंद डोळ्यांतून माझ्या वाहते काहीतरी
रोज खिडकीतून बघते एकटक माझ्याकडे
पाखरू डोळ्यांत माझ्या वाचते काहीतरी
एक म्हातारा उगाचच बोलतो काहीतरी
एक म्हातारी उगाचच ऐकते काहीतरी
वार करताना कुणावर घाव तोही झेलतो
शांत झाल्यावर शिवाला झोंबते काहीतरी
डॉ. शिवाजी काळे
राशीन, जि. नगर
मो. 9423751533
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments