![]() |
Gazalkar Kashinath Gawali |
जिंदगी मधुमास आहे
वासनांचा दास आहे
हा मनाला त्रास आहे
विसरलो आहे तुला मग
हा कुणाचा भास आहे
कर्ज डोईवर, गळ्याला
वेदनांचा फास आहे
एक तोरण भावनांचे
टांगले दारास आहे
जन्मणे मरणे तुझ्याविन
हाच तर वनवास आहे
फार मी निश्चिंत मृत्यो
मित्र जर तू खास आहे
सोबतीने यार तुझिया
जिंदगी मधुमास आहे
---------------------
काशिनाथ गवळी
नांदगाव नासिक
९८५०४४१२८७
0 Comments