Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नवे मार्ग शोधायला वाव देते Gazalkar Narayan Surandase

 • गझल प्रभात • (भाग ३)

नवे मार्ग शोधायला वाव देते
Gazalkar Narayan Surandase 

 🌹नवे मार्ग शोधायला वाव देते🌹


निराशा मनाला जरी घाव देते 

नवे मार्ग शोधायला वाव देते 


स्वतःशीच स्पर्धा खुली रोज असते 

पुन्हा खेळ म्हणते पुन्हा डाव देते 


कसा दोष देऊ निरागस जिभेला 

मला त्रास माझी खुळी हाव देते 


खऱ्या माणसाचे खरे गीत गातो 

मला साथ माझे पुरे गाव देते 


तुझी लेखणी एवढी थोर आहे

तुझे नाव सुद्धा मला नाव देते 


मनाच्या स्तरावर नको फार इर्षा 

जुन्या भांडणाला नवा भाव देते  


सुखाचे वळण घेत गाडी असावी 

अचानक धडक फार भरधाव देते 


..कुमारेश

(नारायण किसनराव सुरंदसे)

धामणगाव रेल्वे,

जि. अमरावती 

मो. 8806226665


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक

भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments