• गझल प्रभात • (भाग ४ )
![]() |
Gazalkar Sachin Patil |
🌹कुणाचेच आयुष्य रंगीत नाही🌹
तुला विठ्ठला फक्त माहीत नाही
कुणी येत निरपेक्ष वारीत नाही
व्यथेचा ठराविक असा काळ असतो
विधाता तिचे लाड पुरवीत नाही
सुरू काम केलेच जर मी त्रुटींवर
तुझे सत्य ठरणार भाकीत नाही
पहा नीट; आहे किती पारदर्शक
कुणाचेच आयुष्य रंगीत नाही
पुरेपूर खात्री करू देत त्याला
सचिन संकटाला कधी भीत नाही
सचिन पाटील
रा. पाल जि. कोल्हापूर
मो. 9819172585
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments