• गझल प्रभात • (भाग ३२ )
![]() |
Gazalkar Prakash Patwardhan |
🌹अर्थ नाही 🌹
कोरून दंतपंक्ती जगण्यात अर्थ नाही
तोडून प्रेमपाती कुढण्यात अर्थ नाही
जे द्यायचेच असते, त्याची करी उपेक्षा
तू स्नेह दे जरासा, रडण्यात अर्थ नाही
ठोशास एक ठोसा, नेमेच सत्य नसते
प्रेमात सर्व आहे, जळण्यात अर्थ नाही
केव्हा तरी कुठेसा, होणार अन्त आहे
जावे सुखात वेड्या, पिचण्यात अर्थ नाही
सारे विचार येथे, जुळणे अशक्य आहे
मैत्रीतल्या सग्यांना, खुडण्यात अर्थ नाही
प्रकाश पटवर्धन
पुणे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments