Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तो उगाच ट्रोल झाला Gazalkar Mandar Khare

 • गझल प्रभात • (भाग ३३)

तो उगाच ट्रोल झाला
Gazalkar Mandar Khare

🌹तो उगाच ट्रोल झाला 🌹


जिंकलोय वाटताच दाव फोल झाला

जीवनात जिंकण्यात हाच झोल झाला


वाटला जरा भरुन येत घाव आहे 

पाहिले तिला समोर आणि खोल झाला


फक्त हासली बघून ती हळूच त्याला

तो उगाच मित्र मंडळीत ट्रोल झाला 


बॉस नेहमी करेक्ट मानले न ज्याने

तो घरी व नोकरीत फक्त ढोल झाला


शुक्रवार संपताच सोमवार आला

काळ केवढा मधील फ़ास्ट स्क्रोल झाला 


डॉ. मंदार खरे


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments