● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 कबूल आहे 🌷
सुंदर तुझ्या मनाचे हसणे कबूल आहे
प्रेमात रंगताना मरणे कबूल आहे
तोडून बंध सारे आलीस तू किनारी
डोळ्यात या बदामी बघणे कबूल आहे
मी माळतो नव्याने केसात खास गजरा
गजऱ्यात मी पणाचे सरणे कबूल आहे
एकांत भेट होता ओठास ओठ भिडले
देशील ती सजा दे सहणे कबूल आहे
प्रेमात पाडले अन् भरलास तूच खटला
खटल्यात खास आता हरणे कबूल आहे
झेलून वार सारे दु:खात फार होतो
हरणे कबूल नाही लढणे कबूल आहे
बाहेर उंबऱ्याच्या कोणीच ज्ञात नाही
दु:खास आत माझ्या रडणे कबूल आहे
गेलीस दूर जेव्हा विसरून तू सख्याला
विरहास सोसताना झुरणे कबूल आहे
धोका दिलास जेव्हा हृदयात जाळ झाला
आगीत देह माझा जळणे कबूल आहे
ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव
जळगाव
गझलकार मुकुंदरावजी जाधव यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments