• गझल प्रभात • (भाग ४३ )
🟣 नवरात्र विशेष 🟣
🟢आजचा गझल रंग- मोरपंखी हिरवा 🟢
🌹तुझा जन्म बाई धगीचा निखारा🌹
उभा जन्म तू सोसते कोंडमारा!
तुझा जन्म बाई धगीचा निखारा!
तुला मुक्त सारेच म्हणती परंतू
तुझ्या भोवताली जगाचा पहारा!
इथे जन्म घेते..तिथे नांदते तू
घरे दोन असुनी तुला ना निवारा!
तुला जन्म देतो, तुझे दान करतो
किती वाटतो जन्मदाता बिचारा!
तुला भेटला ना कधी एक खांदा
जगाला तरी देत गेली सहारा!
जुन्या चौकटींना जरा सोड आता
तुला व्हायचे व्हायचे ध्रुवतारा!
तुझी गोष्ट ऐकून भिजलेत डोळे
तुझी गोष्ट ऐकून येतो शहारा!
भिती सोडूनी धीट हो तू जराशी
जगाला दिसू दे तुझाही दरारा!
अनिता बोडके
नाशिक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments