• गझल प्रभात • (भाग ४४ )
![]() |
Gazalkar Dr Shivaji Kale |
🟣 दसरा विशेष 🟣 |
🌹माझीही सलगी नाही माझ्याशी🌹
मी ऐकावे कोणाचे, मी बोलावे कोणाशी
गंमत म्हणजे माझीही सलगी नाही माझ्याशी
वारा होता आले तर खिडकीच पुरेशी असते
बंद असो वा उघडे तो झोंबत नाही दाराशी
हा प्रवाह थांबवणारा एखादा डोह दिसावा
मी कासाविस झालो या खळखळत्या ओढ्यापाशी
बस आली तशीच गेली पण धूळ राहिली मागे
मग थांब्यावरचे डोळे बसले बोलत रस्त्याशी
मुद्दाम थांबले काही तर पुढे पळाले काही
चाणाक्ष ऋतूंनी केली गद्दारी आभाळाशी
ही तहानलेली तगमग कळणार कशी वाळूला
मी तो मासा आहे जो भांडभांडतो पाण्याशी
केल्यावर हात शिवाने जी क्षणात धावत होती
होणार कसा तो आता ह्या दुनियेचा चपराशी
डॉ. शिवाजी काळे
मो. 9423751533
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments