• गझल प्रभात • (भाग ३५ )
![]() |
Gazalkara Dr Snehal Kulkarni |
🟣 नवरात्र विशेष 🟣
🟠आजचा गझल रंग- केसरी 🟠
🌹 जमते मला 🌹
शेवाळलेल्या कातळावर धावणे जमते मला
वेगात असल्यावर अचानक थांबणे जमते मला
या लोलकाचा कवडसा.. डोळ्यावरी पाडू नका
सूर्यास सुद्धा एकटक न्याहाळणे जमते मला
गालांवरी खोटीच लाली आणते केंव्हातरी
माळून वासाची फुले शृंगारणे जमते मला
फिरलास तू विश्वात साऱ्या..पाहिजे तेथे जरी
नाडी तुझी हातात माझ्या ठेवणे जमते मला
आहेस तू माझा असे मी एकदा म्हटल्यावरी
परकेपणाला मग पुढे धिक्कारणे जमते मला
नादी नको लागूस माझ्या..सांगते शपथेवरी
वेशीवरी टांगून अब्रू..भांडणे जमते मला
मेटाकुटीला जीव जर आलाच तर संतापते
वृत्ती दयाळू एरवी मग ठेवणे जमते मला
डॉ. स्नेहल कुलकर्णी (दिशा)
गारगोटी, कोल्हापूर
मो. 9922599117
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments