Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आभाळ घेतले मी माझ्या कवेत आहे Gazalkar Anil Kamble

 • गझल प्रभात •   



 🌹आभाळ घेतले मी माझ्या कवेत आहे🌹


बस एवढेच माझ्या, लिहिले कथेत आहे

तीही मजेत आहे, मीही मजेत आहे


पाना फुलात सळसळ, झाली कशी अचानक

कळले असेल बहुधा, ती आज येत आहे


हे पेटत्या दिव्यांनो, रोखून श्वास ठेवा

मज वाटतो तिचाही, खासाच बेत आहे


वा-या नकोस होऊ, अजुनी खट्याळ आता

आधीच मी प्रियेच्या पुरता नशेत आहे


तू दाखवू नको रे, भिती मला कशाची

आभाळ घेतले मी माझ्या कवेत आहे


अनिल कांबळे 


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments