Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

कातळाला कापणारी धार मी-Gazalkara Mamata Sindhutai Sapkal

• गझल प्रभात •    (भाग ३६ )

कातळाला कापणारी धार मी
Gazalkara Mamata Sindhutai Sapkal

🟣 नवरात्र विशेष 🟣

🌼आजचा गझल रंग- पांढरा 🌼

🌹कातळाला कापणारी धार मी 🌹

शक्यतांचे बंद केले दार मी

शांततेने घेतली माघार मी.!


वाव मेंदूला दिला आहेस तू

मग कसे घेऊ मनावर फार मी.!


मी तुझे उपकार फेडावे कसे?

फक्त मानू का तुझे आभार मी?


घाव तू देऊनही नंतर पुन्हा

घेतला होता तुझा कैवार मी.!


कोण जाणे देव होता कोणता

ऐकलेला फक्त जयजयकार मी.!


भंगणे माझे अता विसरून जा

कातळाला कापणारी धार मी.!


स्पर्श आहे केवढा कोमल तुझा

सांग आहे केवढी अलवार मी.!


वागतो आहोत आताशा जणू

तू विरोधी पक्ष अन सरकार मी.!


- ममता सिंधुताई सपकाळ.


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•

Post a Comment

0 Comments