• गझल प्रभात • (भाग ७४ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकार डॉ शिवाजी काळे |
🌹पंढरपुरात कळले आयुष्य काय आहे🌹
सरत्या वयात कळले आयुष्य काय आहे
पंढरपुरात कळले आयुष्य काय आहे
आयुष्य काय आहे कळण्यात जन्म गेला
एका क्षणात कळले आयुष्य काय आहे
रेखीव जीवनाची व्याख्या विरून गेली
रानावनात कळले आयुष्य काय आहे
नव्हते खरे कधीही जे मानले खरे मी
खोट्या जगात कळले आयुष्य काय आहे
खिडकीमधून आले जेव्हा तुषार काही
भर पावसात कळले आयुष्य काय आहे
अस्तित्व राखण्याचे मिटतील प्रश्न सगळे
जर उत्तरात कळले आयुष्य काय आहे
साधीसुधी गझल तो.. नाही म्हणत शिवाची
ज्याला तिच्यात कळले आयुष्य काय आहे
डॉ. शिवाजी काळे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments