🌼 दिवाळी विशेष 🌼 
गझलकारा शरयू शहा
🌹 गुजगोष्टी 🌹
💥खालील बाबी प्रत्येक गझल साधकाला माहीत असणे आवश्यक आहे.
💥इंग्रजीत टायपिंग नको.
💥*मराठीतच* टायपिंग हवे.
ती सोय नसेल तर ताबडतोब करून घ्या. आणि मराठी भराभर टाईप करण्याची सवय करा. रोज कमीत कमी दोन पॅरेग्राफ तरी टाईप करा. कारण स्पीड वाढायला हवा.
💥कॅापी पेस्ट करणे.
💥टॅग करणे.
💥नको असलेले तेव्हढेच डिलीट करणे.
💥अक्षराचा पाय मोडणे..
हे सारे माहीत हवे.
्.. हे येत नसेल तर माहीत करून घ्या.
💥ऋकार ..उदा. ृ वृक्ष, कृष्ण, कृपा..
हेही माहीत करून घ्या.
.. या सर्व गोष्टी येतात का ? कारण आता वरचेवर त्याची गरज पडणार आहे.
जर येत नसतील तर आत्ताच शिकून घ्या.
🔴🔴
💥*क्लास चालू असताना..
💥हे येत नाही. होत नाही.
💥मला माहीत नाही*असे म्हणाल तर तेवढा वेळ नसतो. व क्लासमधे तुम्ही मागे पडत जाल. म्हणून
🔴प्रत्येक साधकाने सगळ्या आवश्यक बाबी..
*परत परत प्रॅक्टीस करून सवयीच्या करून घ्याव्यात* व क्लासबरोबर रहावे.
तसेच..
💥मराठी लेखन *शुद्धच* असायला हवे.
💥त्यासाठी शब्दकोशाचा वापर करा.
प्रत्येक शब्द अडला की शब्दकोशात पाहून तो बरोबर असल्याची खात्री करून मगच पोस्ट करावा.
💥प्रत्येक सूचना नीट काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💥मराठी भाषेचे व्याकरण जपायला हवे.
💥लेखनात खूप चुका होत आहेत.
💥लेखन नेहमी शुद्धच यायला हवे. 💥गझलेमधील प्रत्येक शब्द शुद्धच लिहायला हवा. प्रत्येक साधकाने ही काळजी घ्यायलाच हवी. सुरुवातीला शब्दकोशात वरचेवर पहावे लागते. नंतर ते शब्द नजरेत बसून जातात, बोटात रुळून जातात.
पण..
परत चूक होऊ नये म्हणून चुकलेला शब्द २०/३० वेळा लिहा. ही गोष्ट खरं तर तुमची तुम्हीच करायला हवी. कारण त्याच त्याच चुका होत रहातात.. याचा अर्थ तोच होतो ना ? तेव्हा काळजी घ्या.
कारण..
🔷एकाही चुकीला गझलेत माफी नसते🔷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गझलेतील प्रत्येक गोष्ट पूर्णपणे समजून घेऊन आत्मसात करा. बेस पक्का व्हायला हवा. नाहीतर त्यावर आधारित पुढील गोष्टी उमजणार नाहीत. म्हणून प्रत्येकाने अभ्यास करण्याबाबत दक्ष राहिले पाहिजे.
💥बऱ्याच वेळेला auto correct होऊन जाते. तेही नकळत ! म्हणून पाठवण्यापूर्वी
बरोबर आहे ना ?याची खात्री करूनच पोस्ट करा.
💥मतला
💥समान अक्षरे
💥बदलते अक्षर
💥अलामत..हे सारे नीट समजून घ्या.
💠हे नीट कळले
💠तरच
💠गझल लेखन
💠जमणार आहे.
💥गझल तंत्र अवघड वाटतंय का ?..
अवघड असलं तरी अशक्य मुळीच नाही. कारण सरावानं सारं काही शक्य होत असतं !
💥शिकवलेला भाग पूर्ण कळेपर्यंत वाचत रहा. तरीही न कळल्यास वहीत लिहून काढा.
💥गृहपाठ पाठवताना खालील गोष्टींची खात्री करून मगच पाठवा.
🔷शब्द बरोबर लिहिलाय का ?
🔷लगावली बरोबर आहे का ?
🔷पाठवण्यापूर्वी गृहपाठ बरोबर आहे ना ? याची खात्री करून टाका.
..त्यासाठी दोघा दोघांचा वा दोघींचा गट करून एकमेकांचे तपासा. व नंतरच पोस्ट करा.
(कारण चुका दुसऱ्याच्या आधी दिसतात)
🔷 आता कुणाचेही काहीही चुकायला नको आहे.
🔷आमचे लक्ष तर असणार आहेच पण एकमेकांचाही अभ्यास तुम्ही पहात तपासत गेलात तर तुमच्या ज्ञानात भरच पडणार आहे.
आणि काही चुकले तर आम्ही आहोतच की !
पण..
इतरांचा गृहपाठ तुम्हीही अभ्यासपूर्वक तपासत राहिल्यास तितक्या पटीने प्रत्येकाचा हा..
“अभ्यास सरावच” होणार आहे !
🔷खरोखर मनापासून गझल शिकायची असेल तर समर्पण भावाने प्रत्येक संधीचे सोने करीत रहायला हवे.
कारण त्यातूनच आपला प्रगतीचा मार्ग तयार होत असतो.
🔷गझल सहजपणे कधीच येत नाही.
दिवसरात्र, अविरत भरपूर कष्ट करण्याची तयारी हवी. तेव्हा कुठे आपण ज ऽ ऽ रा गझलच्या जवळ जाऊ शकू. आणि त्यासाठीच अफाट मेहनत करण्याची तयारी मात्र हवी.
🔷कशी येत नाही गझल ?
🌷मिळवूनच दाखवीन🌷
या जिद्दीने, आत्यंतिक ध्यासाने, तळमळीने, चिकाटीने प्रयत्न करा.
🌷नक्की येईल गझल🌷
🌿🔶🌿🔶🌿🔶🌿
*गझलेतील अतिशय महत्त्वाच्या बाबी*..
या सर्व नीट समजून घ्या.
💥मिसरा म्हणजे ओळ.
💥उला मिसरा..
१ ली ओळ
💥सानी मिसरा..
२ री ओळ.
💥मतला-
पहिला शेर
💥बाकी सर्व शेर
💥गझलेत कमीत कमी मतला धरून ५ शेर हवेत.
मात्र विषम संख्येत कितीही असू शकतात.
💥रदिफ.. मतल्यातील दोन्ही मिसऱ्यात शेवटी येणारे शब्द वा शब्दसमूह, तसेच पुढच्या प्रत्येक शेरात सानीत शेवटी येणारे शब्द वा शब्दसमूह.
रदिफ..
स्त्रीलिंगी शब्द.
💥काफिया-रदिफच्या आधीचा यमकात्मक शब्द !
💥काफिया-
एक वचन
💥कवाफी-
अनेक वचन
💥अलामत..
कवाफीतील समान अक्षराच्या अलिकडील, बदलत्या अक्षरातील समान स्वर.
त्याला अलामत म्हणतात.
💥अलामत..
गझलेचा आत्मा आहे.
💥एका गझलेत एकाच अलामतीचे कवाफी हवेत.
👆या सर्व बाबी नीट समजून घ्या. खरं तर तोंडपाठच करायला हव्यात.
🌿🔶🌿🔶🌿🔶🌿
लगा, गाल,
लगाल, लगागा, गालगा, गागाल,
गालगागा,गागालगा,
लगागाल,गाललगा,
लगालगा, गालगाल, लगालगागा, गागालगागा,
👆असा प्रत्येक लगावलीतला शब्दसंग्रह वाढवताय ना ?
💥प्रत्येकाजवळ शब्द खजिना अगदी भरपूर हवा.
💥जोडाक्षराचे शब्द घेऊन त्याचीही लगावली काढण्याचा भरपूर प्रयत्न करा.
प्रयत्न जिद्द चिकाटी.. ही
💥यशाची रत्नत्रयी💥
💥या गोष्टी आता कुणी कुणाला सांगायची गरज नाही. कारण प्रत्येक शब्दाची लगावली बरोबरच यायला हवी..
असं प्रत्येकाला मनापासून वाटायला हवं.
व त्यासाठीचा परिपूर्ण प्रयत्न प्रत्येकाने करायलाच हवा. तरच तुमच्यात सुधारणा होणार आहे.
🌷गझल देवतेला🌷
प्रसन्न करायचे तर..
🔷प्रयत्न जिद्द🔷
🔷चिकाटी🔷
हीच..
💥यशाची रत्नत्रयी आहे💥
तिचा पाठपुरावा करा.
गझल लेखनात अचूकता येण्यासाठी
💥दोघा दोघांचा किंवा दोघी दोघींचा ग्रूप करून एकमेकांचे तपासा.
गझल देवता निश्चितच
प्रसन्न होईल.
डॅा. शरयू शहा
मुंबई.
मो. 9619023330
_______________________
संयोजक: भरत माळी
मो. 9420168806
गझल मंथन साहित्य संस्था
_______________________
0 Comments