• गझल प्रभात • (भाग ६७ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकार जयदीप विघ्ने |
🌹ही जखम तुझ्या भोळ्या बहाण्याची🌹
ही खरी संधी अडाण्या रोप होण्याची
'फाटक्या झोळीत पडलो' खंत दाण्याची...?
मी बहीऱ्या काळजाचा ओंडका आहे
अन तिला म्हणतो करूया सैर पाण्याची
ह्याच खपलीवर कशाला मारली फुंकर
ही जखम आहे तुझ्या भोळ्या बहाण्याची
मन गिळाया लागले घायाळ आवंढे
अन तुला चिंता त्वचेवरच्या खकाण्याची
या निघू येथून तरण्याबांड दुःखांनो
वेळ ही नाही जरी येथून जाण्याची
जयदीप विघ्ने
मो. 7972449691
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments