• गझल प्रभात • (भाग ६८ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकारा शरयू शहा |
🌹दिवाळी 🌹
मनाला नि प्राणास देऊ झळाळी, अशीही दिवाळी करू साजरी
फटाके नको थेट कानी कपाळी, अशीही दिवाळी करू साजरी
किती साचलेली मनी जळमटे ही, घराची मनाची सफाई करू,
जपू प्रेम अपुलेपणाची नव्हाळी, अशीही दिवाळी करू साजरी
प्रपंचात हरणे शिकू या जरासे, किती त्यात गंमत न्यहाळू तरी
नि तडजोडही पाहिजे सर्वकाळी, अशीही दिवाळी करू साजरी
फटाके खरेदीस देऊन सुट्टी, अनाथाश्रमी लागती कारणी
गरीबास दे पुरणपोळी नि थाळी, अशीही दिवाळी करू साजरी
विसरतात दुःखास देऊन हर्षा, अशा दैवतांच्या रहावे जवळ
सुखाचेच वरदान वृध्दापकाळी, अशीही दिवाळी करू साजरी
डॅा. शरयू शहा
मुंबई
मो. 9619023330
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments