• गझल प्रभात • (भाग ७३ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकार जयराम मोरे |
🌹वागून घेत आहे 🌹
या वेदनेस आता शोषून घेत आहे
दुःखास मी जरासे झाकून घेत आहे
घ्या वाटणीत ठेवा अमृत कलश तुम्हाला
हिश्श्यात मी विषाला प्राशून घेत आहे
मी टांगल्या खुटीला सगळ्याच जाप माळा
गाथा विकून दारू चाखून घेत आहे
इतिहास लेखणीचा उजळू अता कशाला
खोट्या पुढे स्वतःला झुकवून घेत आहे
शिकवू नको मला तू संस्कार कोणतेही
दुनिये तुझ्याप्रमाणे वागून घेत आहे
जयराम मोरे
सोनगीर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments