Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

उदास आहे मन Gazalkar Nishant Guru

• गझल प्रभात • (भाग ७२ )

🌼 दिवाळी विशेष 🌼

उदास आहे मन
गझलकार निशांत गुरू 


🌹उदास आहे मन 🌹


थोडी दारू दवा मागवा उदास आहे मन

सखीस कोणी तरी बोलवा उदास आहे मन


ऊर पोळतो या पुनवेच्या चांदण्यामधे ही

त्या चंद्राला कुणी झोपवा उदास आहे मन 


 स्वप्न सुगंधी रुसून बसले उरात लपले भय

त्या स्वप्नांचा हटवा रुसवा उदास आहे मन


आठवणींच्या पक्षांनी या उरी बांधले घर

दोस्तांनो तो खुणवतो थवा उदास आहे मन


ओठांवरती मौन उगवले हसू विसरलो मी

हसून सारे मला हासवा उदास आहे मन 


व्यसनी झाली नजर ही चटक लावल्यामुळे तू 

दे नजरेला प्यायला दवा उदास आहे मन


ओल्या वाळुत आयुष्याचे नाव कोरले मी

त्या लाटांना जरा थोपवा उदास आहे मन


निशांत गुरू


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments