Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

स्वर्गाहुनी Gazalkar A K Shaikh

 • गझल प्रभात •    (भाग ६२ )

🌼 दिवाळी विशेष 🌼

स्वर्गाहुनी
Gazalkar A K Shaikh 


🌹 स्वर्गाहुनी🌹


स्वर्गाहुनी नसे कमी काहीच ही धरा 

माझी प्रिया तशीच ती स्वर्गीय अप्सरा 


गालावरी फुले असू ते गोड सारखे 

ते शर्करीच बोलणे खळखळ जसा झरा 


गोंजारते सदाच ती शब्दांस आपुल्या 

तरिही म्हणे कसे मला शब्दांत सावरा 


सौंदर्य अप्रतीम जणू कोरीव शिल्प ते

आविष्करण खुदा तुझे खिळतातच नजरा 


ती पौर्णिमा मुखावरी खुलते सदा कशी 

तिज चंद्र तारका म्हणू की चांदणे जरा


ऄ. के. शेख


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments