• गझल प्रभात • (भाग ६६ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकार संजय गोरडे |
🌹 मुरते कलंदराच्या हृदयामधे गझल🌹
जी जी म्हणाल ती ती करतो सुधारणा
पण ह्या कलाकृतीला कोणी 'गझल' म्हणा!
चुकते कधी अलामत जुळतो न काफिया
वाट्यास फक्त माझ्या येते प्रतारणा
हा एक सांगतो तर तो एक सांगतो...
सगळीकडून माझी नुसती कुचंबणा
फुत्कारतात नेहमी इथले गझल गुरू
एकेक नाग इथला बस काढतो फणा
गझलेकडून काहीच नाही शिकत कुणी
नक्की कुठून येतो इतका खडूसपणा?
इतकी सहज कुणाला गेली शरण गझल
इतक्यात वाकणारा नाही तिचा कणा
मुरते कलंदराच्या हृदयामधे गझल
थोडे सहन करूया थोडी सुधारणा!
सौभद्र
संजय गोरडे
नाशिक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments