• गझल प्रभात • (भाग ७८ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकारा दिपाली कुलकर्णी |
🌹मला व्हायचे आत्मनिर्भर 🌹
विसंबून राहू किती अन् कुणावर
ठरवले, मला व्हायचे आत्मनिर्भर
नको चांगले वागणे एवढेही
नको व्हायला आपला गैरवापर
मला भावला फक्त संसार कायम
कसे पाश तोडून येवू तिरावर
पुन्हा शब्द झाले..कडू कारल्यागत
किती काळ टिकणार साखर जिभेवर
सतत सोबतीला असे जन्मभर ती..
चिरंतन व्यथेला सजव, लाव झालर
कसे जन्मभर पाय दुमडून ठेवू
हवी वाटते एक विस्तीर्ण चादर
उगा वाद घालू कशाला निरर्थक
तुझी 'चूकही' सिद्ध होते बरोबर
कधी घालते साैख्य घरट्यात पिंगा
कधी फक्त जखमा नि अश्रू अनावर
तुझे भाव कळले..तुझ्याही अगोदर
तुला वाचले रोज इतके निरंतर
साै. दिपाली कुलकर्णी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments