• गझल प्रभात • (भाग ७७ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकार प्रकाश पटवर्धन |
🌹लागतात खांदे तिरडीस न्यावयाला 🌹
उरले असे न कांही इतरांस सांगण्याला
असले तरी कुणी का येते पहावयाला
अपुल्या घरातले का होतात दूर सांगा
इतके तयार कैसे संबंध तोडण्याला
समजून घ्या प्रयोजन तुटण्यास बांध घाला
व्हावे तयार आपण मागे हटावयाला
बदनाम शेवटाला तू आणि मीच होतो
तत्पर सभोवताली नाटक बघावयाला
मी एकटाच आलो अन एकटेच जाणे
पण लागतात खांदे तिरडीस न्यावयाला
प्रकाश पटवर्धन
मुलुंड (पू)
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments