• गझल प्रभात • (भाग ६३ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
गझलकारा डॉ स्नेहल कुलकर्णी |
🌹तुझ्यामुळे 🌹
प्रेमात जीवनाच्या पडले तुझ्यामुळे
मी हारले म्हणू की घडले तुझ्यामुळे
हसलोच एवढे की पान्हावली नजर
लोकांस वाटले मी रडले तुझ्यामुळे
नव्हतास तू जवळ तर.. गेले गळून मी
श्वासागणीक माझे अडले तुझ्यामुळे
हलली तुझी डहाळी....मी राहिले उभी
पदरात फूल माझ्या पडले तुझ्यामुळे
झोपेत हासते मी.. दिवसा तरंगते
शाही विकार सगळे जडले तुझ्यामुळे
कैलास पर्वतावर.. फिरलो धुक्यामधे
दर्शन जिवाशिवाचे घडले तुझ्यामुळे
शृंगारलीस कायम वधुसारखी 'दिशा'
वय वाढले तिचे पण.. दडले तुझ्यामुळे
.. दिशा
( डॉ. स्नेहल कुलकर्णी )
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments