• गझल प्रभात • (भाग ७९ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
🌹ही दुनिया असते विंगेतुन बघणारी 🌹
मी संसारी वावरते मासोळी तळमळणारी
ही अख्खी दुनिया असते मज विंगेतुन बघणारी
मी रोज नवे शिंपडते एकेक कळीवर अत्तर
बातमी वनी पसरवते पाकोळी घमघमणारी
भेटीस किनारी येतो पण खवळत असतो सागर
का गझल ऐकवू त्याला वाळूची मुसमुसणारी
सुख गिरवायाचे होते झुंझार तुझ्या भाळावर
सटवीची लुडबुड झाली नशिबावर कडमडणारी
जी फुटल्यावरती उकळी कोंडणे अशक्यच असते
मी व्यथा कोंडली आहे लाव्हयासम खदखदणारी
स्मिता गोरंटीवार
वणी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments