Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

बोलून गोड येथे छळतात लोक हल्ली Gazalkar R K Athavale

• गझल प्रभात • (भाग ८० )

🌼 दिवाळी विशेष 🌼

बोलून गोड येथे छळतात लोक हल्ली
गझलकार आर के आठवले 


🌹बोलून गोड येथे छळतात लोक हल्ली🌹


वाणीत फक्त साखर भरतात लोक हल्ली

बोलून गोड येथे छळतात लोक हल्ली


विसरायचे ठरवले कित्येकदा तुला मी

पण आपलीच चर्चा करतात लोक हल्ली


केला पुन्हा घरोबा पहिल्याच प्रियकराशी

शिकलीस राजकारण म्हणतात लोक हल्ली


सांत्वन करून माझे जातात लांब थोडे

हासून मग तमाशा बघतात लोक हल्ली


मिळते कुठे जगाया येथे मनाप्रमाणे

इच्छा मनात बहुदा पुरतात लोक हल्ली


मेंदूवरी पुढारी करणी करून गेला

अन् मेंढरापरी हे पळतात लोक हल्ली  


होतो लिलाव रोजच येथे मतामताचा

होऊन षंढ केवळ बसतात लोक हल्ली


आर. के. आठवले


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments