• गझल प्रभात • (भाग १०९ )
![]() |
गझलकारा मानसी जोशी |
🌹ओंकार प्रेमाचा 🌹
मनाला नेहमी असतो खरा आधार प्रेमाचा
तुझा हुंकारही वाटे मला ओंकार प्रेमाचा
तुला भेटून मी माझ्या व्यथेला दूर पाठवले
सुखाला लाभला आहे असा गंधार प्रेमाचा
प्रकाशाने जमवली घट्ट दोस्ती सूर्यदेवाशी
उजळली रात्र ज्योतीने विरह अंधार प्रेमाचा
जगी बहुतेक लोकांना फसवण्याचे व्यसन असते
स्वभावा त्या बदलण्याचा असे निर्धार प्रेमाचा..
तुझ्या चक्रम स्वभावाने मनाने दूर गेलो मी
अता संसार करताना उरे व्यवहार प्रेमाचा
प्रा. सौ. मानसी मोहन जोशी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments