• गझल प्रभात • (भाग १३२ )
![]() |
गझलकार सदानंद डबीर |
🌹चाललो मी 🌹
ढकलले तू जन्मलो मी
'खेळ!' म्हणता खेळलो मी
सूत्र ते अदृश्य होते..
खेचता तू नाचलो मी!
दुःख होते.. वेदनाही
'सोस!' म्हणता.. हासलो मी!
ना दिला घेऊ विसावा..
'धाव!' म्हणता धावलो मी!
मी मुळी माझाच नव्हतो..
'भक्त' होउन.. राहिलो मी!
'तू दयाळू!' हीच अफवा!
प्रार्थनेतच अडकलो मी!
फार झाले खूप फसलो!
खेळ सोडुन चाललो मी!
सदानंद डबीर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments