Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दाराशी Gazalkar Shivaji Javare

• गझल प्रभात •  (भाग १३६ )

दाराशी
गझलकार शिवाजी जवरे 


🌹दाराशी🌹



तुझ्यासाठी न केली मी कधी आरास दाराशी

कळेना का तुझे होती मला आभास दाराशी


खरे आवाजही आता कुठे रस्त्यावरी येती

अघोरी सभ्यता देते पहारा खास दाराशी


जगाचे दु:ख गाताना गळा हा मोकळा राहो

कुण्या व्यक्ती-विचाराचा नको तो फास दाराशी


तुझ्या कुंडीतले पाणी पुरेल नाही मला आता

पितो आकाश मी तू दे खुला आवास दाराशी


मला वेचायचे काटे खुले ठेऊन हे डोळे

नको तो मुग्ध करणाऱ्या फुलांचा वास दाराशी


कशाला मागते वेडे शिळी वेणी चमेलीची

फुले मी वेचतो खाली जरा तू हास दाराशी


मराठी मायभू माझी जिथे जे पाहिजे देते

फुले कापूस रानाने घरी गुलबास दाराशी


शिवाजी जवरे


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments