• गझल प्रभात • (भाग १३७ )
![]() |
गझलकार शेखर इक्बाल मिन्ने |
🌹सांजवेळी🌹
कल्लोळ भावनांचे उठतात सांजवेळी
टाके जुन्या स्मृतींचे खुलतात सांजवेळी
उडती पहाटवेळी शोधात चार दाणे
होऊन तृप्त पक्षी फिरतात सांजवेळी
करतो प्रयत्न कायम विसरायचा तिला मी
डोळे अजून माझे भिजतात सांजवेळी
रखरख उन्हात साऱ्या रानात रोज चरुनी
गोठ्याकडेच गाई निघतात सांजवेळी
आईस फक्त ठाउक कष्टायचे दिवसभर
चालून पाय आता थकतात सांजवेळी
फिरतात पाय माझे सारा दिवस कुठेही
वाटेकडे घराच्या वळतात सांजवेळी
आयुष्यभर कधीही स्मरला न देव त्यांना
पण देव देव आता करतात सांजवेळी
कार्यात मग्न असतो सारा दिवस तरीही
कविता गजल रुबाया सुचतात सांजवेळी
'इक्बाल' का असा तू होतोस कावरा रे
ते कोण जे तुलाही छळतात सांजवेळी
डॉ. शेख इक्बाल मिन्ने
मो. 7040791137
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments