• गझल प्रभात •(भाग ११३ )
![]() |
गझलकार वसुदेव गुमटकर |
🌹स्वतःला जाणुया आपण नव्या वर्षी🌹
व्यथेला झाकुया आपण नव्या वर्षी
सुखाला पाहुया आपण नव्या वर्षी
जुने झाले जमा मागील वर्षाला
नव्याने चालुया आपण नव्या वर्षी
कशाला घुटमळावे गत स्मृतींमध्ये
नकोसे विसरुया आपण नव्या वर्षी
तुझ्या-माझ्यामधे आता नको भांडण
कुशंका मिटवुया आपण नव्या वर्षी
असावी आपली ओळख स्वतःशीही
स्वतःला जाणुया आपण नव्या वर्षी
वसुदेव गुमटकर 'देवकुमार'
मेहकर, बुलढाणा
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments