Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सूर्य - सावल्या Gazalkara Pradnya Kulkarni

 • गझल प्रभात •(भाग ११२ )

सूर्य - सावल्या
गझलकारा प्रज्ञा कुलकर्णी 


🌹सूर्य - सावल्या 🌹


सावल्यांचा सूर्य प्रियकर होत जातो

छेडतांना लाल मनभर होत जातो


एकट्या जीवास जेव्हा त्रास होतो

एक कप्पा रोज कणखर होत जातो


जन्मजातच फार हळवे रूप माझे

आरसाही शांत क्षणभर होत जातो


का अताशा शांत बसते सांग शाई

घाव कोणाचा तुझ्यावर होत जातो


संयमाने शब्द कायम वापरा हो

घाव शब्दांचा मनावर होत जातो 


ज्योत अंधारास देते साथ कायम

काजळीचा थर अनावर होत जातो


एक होती भिंत माझे ऐकणारी

का तिलाही कान अडसर होत जातो


सौ. प्रज्ञा कुलकर्णी 'राज्ञी'

मो. ९६५७९४८३९४


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments