• गझल प्रभात • (भाग १२६ )
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹पाठीत वार झाले 🌹
खोटेच बोलणारे आदर्श फार झाले
सत्यास जागणारे युद्धात ठार झाले
झाकून नेत्र माझे विश्वास ठेवला मी
विश्वासघात झाला पाठीत वार झाले
अश्रू पिऊन माझ्या दु:खास भोगले मी
आश्वासने फुकाची आभार भार झाले
गेला जळून येथे अभिमान पौरुषाचा
नेसून नार वसने पुरुषत्व नार झाले
नाही प्रकाश कोठे अंधारल्या दिशाही
गर्दीत धावणारे ते अंध स्वार झाले
विकास मधुसूदन भावे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments