Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

निखारा Gazalkara Anuradha Waykos

• गझल प्रभात • (भाग १२५ )

निखारा
गझलकारा अनुराधा वायकोस 


🌹वाढदिवस विशेष 🌹


🌹निखारा 🌹 


जगी आसवांचा पसारा कशाला?

नदी सागराची किनारा कशाला?


लढा जीवघेणा असे जीवनाचा

 कुणा काफ़िरांचा सहारा कशाला?


उगी छंद माझा खुळा जाणिवेचा ,

नको मोहणारा नजारा कशाला?


किती तोडलेली फुले ही अवेळी,

पुन्हा लाजतांना शहारा कशाला ?


जरा शांत झाली चिता पेटलेली,

उरी राहिला हा निखारा कशाला?


अनुराधा वायकोस


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments