• गझल प्रभात • (भाग ११५ )
![]() |
गझलकारा अलका देशमुख |
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹बोल काही तू मनाशी🌹
हो, जगाला भीत गेली ती जराशी
धाक उपरा पोसते.. आहे उपाशी
फार अल्लड वागते वाटे जगाला
घेत जाते गोत सगळे मग उशाशी
कोडग्या झाल्यात जखमा आतल्या पण..
थांब आता.. बोल काही तू मनाशी
थांबला तो संपला म्हणतात सगळे
आत जपले..कोंडले दुखणे उराशी?
पाहिले कोणी असे की पाखरांनी
तोडले नाते कधी त्यांचे नभाशी
ती नदी ही वाहणारी डोंगरावर
सोडते का भेटणे त्या सागराशी
मांजराचे वैर असते उंदराशी
सांगते..जग देत जाते दाखल्याशी
अलका देशमुख
मो. 8605521327
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments