• गझल प्रभात • (भाग १२८ )
![]() |
गझलकारा आसावरी जाधव |
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹जगणेही अवघड असू शकते🌹
पुरोगामी विचारांची जिथे पडझड असू शकते
स्त्रियांचे मुक्त जगणेही तिथे अवघड असू शकते
हसत राहून...दुःखाशी तिने सलगी सदा केली
सुखाने राहण्यासाठी तिची धडपड असू शकते
हवेचा झोत आल्याने दिव्याची ज्योत फडफडली
अखंडित तेवण्यासाठी तिची फडफड असू शकते
तिने स्वीकारले नाही कुणाच्याही गुलामीला
स्वतःला सिद्ध करण्याची कला फक्कड असू शकते
मुलीचा जन्म झाल्यावर नकोशी वाटते ज्यांना
प्रजाती मानवाची ती किती भेकड असू शकते
सौ. आसावरी जाधव
विरार
7499370593
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments