• गझल प्रभात •
🌹ठेवतो मी लक्ष माझे शंभरीवर 🌹
नेहमी असते सुरक्षा जोखमीवर
नित्य ठेवावे रिपूला पाळतीवर
धुंद होतो आमच्या विश्वात आम्ही
लक्ष नव्हते आमचे शेजारणीवर
सावरायाला दिव्याची वात आहे
ती नजर ठेवून आहे यामिनीवर
मौन असतो कान देतांना जगाला
ऐकतो जन भावना सम पातळीवर
कोण म्हणतो श्वास हा अंतीम आहे
ठेवतो मी लक्ष माझे शंभरीवर
प्रकाश पटवर्धन
मुलुंड (पूर्व)
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments