Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

लोकांनो Gazalkar Satish Darade

• गझल प्रभात •   

लोकांनो


 🌹 वाढदिवस विशेष 🌹

🌹लोकांनो..🌹


नका काढू मढ्याची जात लोकांनो..

जळू द्या ना समाधानात लोकांनो..


अता पडला जुन्या वादावरी पडदा

मला ओढा नव्या वादात लोकांनो..


कुणी हाकेस ओ का देत नाही रे

अरे आहात की मेलात लोकांनो..


शिसारी आणते ही चेहरेबाजी

नका राहू अशा लोकात लोकांनो..


फळे लागायच्याआधी मुळे विकली

अता काटे भरा पोटात लोकांनो..


सतीश दराडे


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments