• गझल प्रभात •
🌹महिला दिन विशेष 🌹
🌹बायका... येथे🌹
बायका झाकून त्यांच्या वेदना हसतात येथे
बायका कायम मनाशी एकट्या कुढतात येथे
लाडकी असते जरी माहेर सुटते लग्न होता
बायका तेव्हा नव्याने सासरी रुजतात येथे
भावनांचा कोंडमारा स्वप्न आशेचा चुराडा
बायका जगण्याकरीता रोज ही मरतात येथे
राग ईर्ष्या द्वेष असूया प्रेम करूणा लोभ ममता
बायका साऱ्या मनस्वी भावना जपतात येथे
सुख असो वा दुःख संसारी
म्हणे माझेच सारे
बायका घर अंगणाशी जन्मभर रमतात येथे
बडबड्या म्हणुनी जरीही हिणवले त्यांना जगाने
बायका बोलून मन हलके जरा करतात येथे
माय आजी बहिण मुलगी सून पत्नी अन् सखीही
बायका या निरनिराळ्या भूमिका वठतात येथे
पावडर लिपस्टीक काजळ आणि कुंकू लाल भाळी
बायका कोणा करीता एवढे सजतात येथे
घालते जन्मास पुरुषा तोच स्त्री ला दुर्बल म्हणतो
बायका सारे मुक्याने सहन का करतात येथे
बंगला गाडी तिच्या साड्या किती सुंदर बघा ना..
बायका का मैत्रिणींवर नेहमी जळतात येथे
ध्येयवादी स्वाभिमानी कर्तृत्वाची भव्य किर्ती
बायका आदर्श ज्या त्या नेहमी स्मरतात येथे..
डॉ. मीना सोसे
लोणार
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments